पण बहुतेक आम्ही सारे ग्रंथपाल खाजगी संस्थाचालकांच्या लेखी पुस्तके देणारे-घेणारे नि त्याचे रेकॉर्ड ठेवणारे थोड्या वेगळ्या प्रकारचे क्लार्कच असतो. ग्रंथपालन नि माहितीशास्त्र विषयात विद्यापीठांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची, माहितीशास्त्रातील संशोधनाची योजना ज्या कारणासाठी केली किंवा ग्रंथपालांना ८०००-२७५-१३५०० या वेतनश्रेणीत आणून शिक्षक संवर्गात बसविले त्यामागचे उद्देश मात्र पूर्ण करण्याची संधी क्वचितच मिळते. असो. आपल्या विचारण्यामागचा उद्देश कळला नाही. (ग्रंथपाल असून माझ्याकडे संक्षेप शोधण्याची कोणतीच सुविधा कशी नाही, किंवा मी त्यासंदर्भात इतका अज्ञ कसा असा प्रश्न पडून जर हे विचारले असेल, तर त्या माझ्या अभ्यासाच्या व्यक्तिगत मर्यादा नि काही प्रमाणात ग्रंथालयाच्या संदर्भ विभागाचे अपुरेपण हे त्याचे कारण आहे. आपण अन्य काही उद्देशाने हे विचारले असेल तर आपणच खुलासा करावा.)