माझ्या माहिती प्रमाणे पक्षांची पिसं काहीशी तेलकट असतात अगदी स्पर्श केल्यावर हाताला जाणवेल इतकी नव्हे पण असतात. यामुळे पिसे चकचकीत दिसतात. ती पाण्यात बुडून पाहिलंय कधी? पीस अगदी सहज पाणी शोषत नाही.

पक्षांच्या अंगावर लहान मोठी अशी असंख्य पिसं असतात. माने जवळ व पाठीवर ती लहान मऊ व दाट असतात, शेपटी आणि पंखाकडे ती लांब चिवट व मजबूत असतात, तर पोटावर ती विरळ असतात जेणे करून अंडी उबवताना जास्त उब मिळावी. मान, छाती व पाठीवर साधारण पक्षांना १ ते २ सेमी इतकं जाड पिसाचे आवरण असते. कोंबडी पिसांसहित व सोललेली पाहिलीत तर हे लक्षात येईल. त्यामुळे सर्वसाधारण पावसाचे पाणी पक्षीच्या त्वचे पर्यंत पोहचत नाही. पंख फडफडल्यावर थोडे फार शोषलेले पाणी देखिल निथळून जाते अगदी मुसळधार पाऊस असेल तरच पक्षी चिंब भिजतात.

मी ही पक्षीतज्ञ नाही. लहान असताना अंगणात कोंबड्या होत्या, आम्ही लहानपणी त्यांच्या अंगावर पाणी उडवायचो हे पाणी सर्र्कन खाली यायचे मोठी गंमत वाटायची. शिवाय लहान असताना कबुतरेही पाळली होती.