आपली मते चुकीची आहेत.
शक्य आहे. पण मला तसे वाटत नाही. मी कुणावर सक्ती केलेली नाही.
माझे मत बदलल्यास जरूर इथे मांडेन.

शक्य असल्यास आपले दोन्ही प्रतिसाद रद्द करावेत किंवा एक स्वतंत्र प्रतिसाद देऊन 'माझा हा प्रतिसाद नजरचुकीने दिला गेला' हे स्पष्ट करावेत.
जमणार नाही. मी नजरचुकीने प्रतिसाद देत नाही.


आपले म्हणणे तसेच राहिले तर शक्यता आहे की काही लोक मात्रा तशाच मोजायला लागतील.
लोक आपल्याला वाटतात, तितके खुळे नसतात.


त्यात आणखीन एक गोष्ट आहे. शाहिस्तेखान या नावाने वावरणारी मूळ व्यक्ती प्रत्यक्षात कुणी तज्ञ आहे किंवा नाही हे लोकांना माहीतच नसल्यामुळे लोक चुकीच्या मात्रा मान्य करतील.
"लोकहो, मी शाहिस्तेखान कुणी तज्ञ नाही. सबब माझी मते योग्य ती खातरजमा केल्याशिवाय मान्य करू नका बरे!"
(आता ठीक आहे का?)


दरखास्तमध्ये काहीही मात्रा दोष नाही.
स्त मधील 'स' चा भार 'खा' वर पडत आहे. त्यामुळे 'खा'च्या दोन मात्रा आहेत त्या दोनच राहात आहेत.
मला तसे वाटत नाही.
मतभेद असू शकतात.

मराठीमध्ये तीन मात्रा किंवा अडीच मात्रा असे काहीही नाही.
मी कुठेही तसे म्हटलेले नाही.  

त्यामुळे त्या ओळीच्या २९ मात्रा होऊ शकत नाहीत.
माझ्यामते, होऊ शकतात. नव्हे, झाल्या आहेत.

धन्यवाद!

(इतर मजकुराच्या संपादनामुळे संदर्भहीन झालेला मजकूर वगळला. : प्रशासक)