@ चक्रपाणी - दरखास्त हा शब्द मराठीत फार पूर्वीपासून अधिकृतपणे स्वीकारला गेला आहे. बहुतेक साऱ्या शब्दकोशांत तो सापडेल. केवळ शब्दकोशात आहे असे नाही तर तो सर्रास वापरलाही जातो, खासकरून न्यायालयीन व शासकीय भाषेत व कामकाजात.
<चक्रपाणि> मिलिंदराव, हा शब्द मराठीत मान्यताप्राप्त असल्याबद्दल, रुळला व वापरला जात असल्याबद्दल मी (आजवर तरी)पूर्ण अनभिज्ञ होतो. याबद्दलची शंका दूर केल्याबद्दल अनेक आभार.
जे शब्द संस्कृतोद्भव नाहीत त्यांना मराठीत स्थानच नाही अशी जर भूमिका असेल तर तो वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकेल.
<चक्रपाणि> (निदान माझी तरी) अशी भूमिका नाही. उलट बिगरमराठी (जसे आंग्लोद्भव) शब्द वापरले जाण्यासही हरकत नाही. मुद्दा इतकाच की असे बिगरमराठी शब्द दैनंदिन संभाषणात मराठी शब्दांइतकेच सहजगत्या वापरले जाणारे, मराठीत व जनमानसात रुळलेले आणि अर्थातच भाषेत अधिकृतरित्या समाविष्ट झालेले असावेत.