तातडीनं
तीन लोक एक ऑक्सिजन सिलिंडर घेऊन आले आणि माझी चौकशी करत, 'घाबरू नको;
होतं असं विमानात. ', असा दिलासा देत त्यांनी मला तो मुखवटा घातला. एक
दीर्घ श्वास, आणि मी निम्मी बरी झाले.
वरील वाक्य वाचून फाईट क्लब चित्रपटातील ब्र्याड पिट आणि एडवर्ड नॉर्टन यांच्यामधल्या विमानातल्या संवादाची आठवण झाली.
पिटः विमानात ऑक्सीजन मास्क का ठेवतात? काही कल्पना?
नॉर्टनः कारण तुम्ही (आणीबाणीच्या वेळी) श्वासोच्छवास करु शकाल.
पिटः चूक. ऑक्सीजनमुळे तुम्हाला नशा येते. अशा आणीबाणीच्या प्रसंगात जोरजोरात श्वासोच्छवास चालू असतो तेव्हा (ऑक्सीजनमुळे) तुम्ही अचानक आनंदी, शांत होता. तुमच्या दैवगतीचा स्वीकार करता. ६०० मैल प्रतितासाने खाली कोसळणाऱ्या विमानातही हिंदू गायींप्रमाणे अगदी समजूतदार.
लेख आवडला. माहितीपूर्ण आणि मनोरंजक आहे.