सुरेखच झालाय लेख मृदुला! खूप आवडला. बारावीत श्वसन  आणि प्रकाशसंश्लेषण या परस्परविरोधी क्रिया कशा आहेत हे अगदी कोळून प्यायले होते त्याची आठवणा झाली. जीवशास्त्र आणि सजीवप्रक्रिया हा माझ्या विलक्षण आवडीचा विषय आहे.

आठवीनंतर इंग्रजीतून जीवशास्त्र शिकल्यामुळे तांत्रिक मराठी समजायला जरा त्रास होईल अशी भीती सुरुवातीला वाटत होती पण तुझी शैली खूपच सुरेख आहे. हिमोग्लोबिनमध्ये प्राणवायू भरून रक्तातली मंडळी एकेका अवयवाकडे अन्नवाटपासाठी निघाली आहेत ही कल्पना तर अतिशय सुरेख. डोळ्यासमोर चित्र उभे करणारी.

फक्त प्रत्येक पेशी खाद्यरेणू जाळते असे म्हणायच्या ऐवजी शर्करारेणू जाळते आणि ऊर्जा मिळवते असं म्हटलं असतंस तर माझ्या डोक्यात जरा लौकर प्रकाश पडला असता. खाद्य = शर्करा हे आठवायला अंमळ वेळच लागला.
पुढील भागांची आतुरतेने वाट पाहते आहे.
--अदिती