स्वाती,

खूप छान लेख झालाय. विषयदेखील चांगला निवडलाय.

मला मुंबईची तशी सवय नाही. त्यामुळे जेव्हाही लोकलमधून प्रवास केलाय, तेव्हा सगळंच नवीन असल्याने आणि बरंच काही ऐकलेलं असल्याने लोकलमधल्या लोकांचं कुतूहलापोटी निरीक्षण केलंय.

खरंच या 'हातातला खजिना' विकणाऱ्या, पंधरा-सोळा वर्षाच्या कोवळ्या वयातच लग्न झालेल्या, चापून-चोपून केस बांधणाऱ्या, नीटनेटकी साडी नेसणाऱ्या मुली लक्ष वेधून घेतात. त्यांचं ते एका हातातला खोका, दुसऱ्या हातात माळांचा गुच्छ आणि त्याच हाताने कमरेवरच्या तान्हुल्याला आधार देणं... हे पाहून आपल्यासारख्याला आश्चर्य आणि कौतुक वाटतं.

बऱ्याच वेळा त्यांचं दुःख बघून कितीही वाईट वाटलं तर बहुदा हळहळ व्यक्त करण्यापलीकडे बहुतेक लोक (कमीतकमी मी) काही करत नाहीत.

आपण तिच्याशी बोलून तिचं दुःख जाणून घेतलं आणि तिला मदत देऊ केली हे अतिशय स्तुत्य आहे...