आमच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये आमच्या वरच्या वर्गातल्या मुलांनी केल्याचे आठवते.
आकाशवाणीचे सांगली केंद्र आणि कोल्हापूर केंद्र यांचे कार्यक्रम असेच मिक्स होतात असे दाखवले होते
सांगली केंद्रावर 'पुरणपोळी कशी करावी' हा कार्यक्रम, तर कोल्हापूर केंद्रावर 'मल्लविद्येची तयारी' हा कार्यक्रम.
संवाद काहीसे असे होते -
प्रथम परातीत कणीक घेऊन - लंगोट बांधा !
नंतर कणीक पाणी घालून हलक्या हाताने - मारुतीला नमस्कार करा !
पुरण शिजत ठेवून - किमान १०० जोर मारा
पुरण शिजले आहे की नाही हे तपासण्यासाठी - पुढच्या मल्लाला दंड थोपटून आव्हान द्या...
आम्ही सगळे हसून हसून लोटपोट झालो होतो. पण त्या मुलांचीही कमाल होती, संपूर्ण प्रयोग त्यांनी न हसता केला होता.
त्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.