कर्बद्विप्रणील हाच शब्द वाचला आहे. बरोबरही वाटतो. 'द' प्रत्यय देणारा या अर्थी तर 'ईल' प्रत्यय असणारा या अर्थी वापरला जातो. (जसे जलद - पाणी देणारा / वरील - वर असणारा... - इथे कार्बन + द्वि प्राण + असणारा))
लेख खूपच आवडला. शाळेत विज्ञान असे शिकवायला हवे या संजोपरावांच्या मताशी सहमत.
खूप पूर्वी मायटोकौंड्रिया हा एक सहजीवी होता आणि मायटोकोंड्रियल डीएनए आईकडून आलेला असतो ही (मराठीत) सहजी उपलब्ध नसलेली माहिती येथे सहजपणे मांडल्याबद्दल आभार. याच डीएनएमुळे जगातील समस्त मनुष्यप्राणी हे एकाच (आफ्रिकन) आईची लेकरे आहेत हे सिद्ध झालेले आहे.