खोडसाळ महाशय, सविस्तर प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद.
माझे वरील प्रश्न म्हणजे 'विडंबना'च्या जनमनातील व्याख्येस मूर्त स्वरूप देण्याचाच एक प्रयत्न आहे.
तुमचे काव्य वरील प्रश्न क्र.१ च्या ड मधील व्याख्येस अनुसरते असे दिसते.
मला व्यक्तीशः, एखाद्या कवितेचे विडंबन म्हणवणाऱ्या कवितेने मूळ कवितेशी, केवळ आकृतीबंधाव्यतिरिक्त आणखी सशक्त संबंध राखावा असे वाटते. म्हणून १ड ही व्याख्या मला मंजूर नाही.
आपली कविता, उत्तम काव्यगुण असलेली, मूळ कवितेच्या आकृतीबंधावर बेतलेली, पण आसमंतातील इतर गोष्टींवर उपहासात्मक भाष्य करणारी नवीन विनोदी कविता आहे. मात्र ती मूळ कवितेचे विडंबन म्हणवण्यास पात्र नाही असे माझे मत आहे.
तरीही आपण प्र.२ ची वस्तुनिष्ठ उत्तरे द्याल तर परिस्थिती आणखी स्पष्ट होईल.
तशी ती आपण द्यावीत ही प्रार्थना.