सन्जोपराव,

नंदनशी सहमत. प्रतिक्रिया लिहू जाता खरोखर शब्द खुंटले. हा लेख कसला! एक अप्रतिम मैफलच जमली आहे.
ही सारी व्यक्तिचित्रे डोळ्यासमोर उभी राहिली. यातल्या कांही पुण्यश्लोकांच्या सहवासाचे मधुकण केंव्हातरी समक्ष
गोळा केलेले. पण कालौघात आणि पोटावर चालता चालता ते मोती कधी आणि कुठे हरवले ते समजलेच नाही.
तुम्ही ते लम्हे पुन्हा तरोताजा केले. आमचा ओंकारप्रसाद त्यात कुठे सापडतो कां ते पाहण्यात थोडा वेळ गेला.
पण 'काश न आती अपनी जुदाई, मौतही आ जाती' म्हणणारा तो कलंदर गेला तो गेलाच. या अशा बिलोरी
आरशांचे कवडसे तुम्ही अजून जपून ठेवेलेले आहेत. यास्तव तुम्हाला आमचाही सलाम.