खाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... ! येथे हे वाचायला मिळाले:


मागचा पोस्ट लिहिल्यानंतर आता कशावर लिहू असा विचार मनात होता. त्यात सध्या मी मेक्सिकोला असल्याने काही प्लान्स सुद्धा होत नाही आहेत. म्हणुन डोक्यात आले की ठाण्याला म्हणजे माझ्या राहत्या शहरात ज्या माझ्या खायच्या फेवरेट जागा आहेत त्याबद्दल लिहावे. आता मी जन्मतः ठाण्याचा असल्याने मला चप्पा-चप्पा माहीत आहे.

सध्या मी इकडे 'वडापाव' जाम मिस करतोय. ठाण्यात वडापाव खायच्या जागांची कमी नाही. ठाणे ईस्टला असाल तर तुम्हाला 'विजय स्नॅक्स कॉर्नर' नक्की माहीत असेल. लहान असताना संध्याकाळी खेळून झाले की, मी किंवा दादा पळत जाउन तिकडून वडापाव आणत असू. ...
पुढे वाचा. : भाग १ - खाण्याला कमी नाही ठाण्याला ...