चाकरमानी गणपति घरी आणता धन्य झाले ।
जन्माष्टमीच्या दिवशी सगळे नाचती धुंद बाले ॥
त्यांचे जीवावरीच इथले सारसर्वस्व चाले ।
ह्या मुंबईचे कितीक मीही पाहिले पावसाळे ॥ १॥
पर्जन्याने दरदिनी कधी पाच सेमी बुडाले ।
मोऱ्यानाल्या भरुनी साऱ्या भूवरी पाणी झाले ॥
त्यातही येती अवस-पुनवा तेधवा चढती नाले ।
ह्या मुंबईचे कितीक मीही पाहिले पावसाळे ॥ २ ॥