शिवरायांवर रचलेले काव्य... येथे हे वाचायला मिळाले:
(चाल :- महाराज शिवाजी छत्रपतीची कीर्ति )
चौक १
धन्य धन्य शिवाजी महाराज पराक्रमी महान् ।
महा मत्त मारिला ज्याने अफझुलखान ।
शाहिस्त्याची बोटें तोडुनी केला हैराण ।
कांपती यवन थरथरां, म्हणती अंतरा,
शिवाजी खरा, बडा सैतान ॥ध्रु०॥
एके दिवशी जिजाबाई विचार करुनी स्वमनाचा ।
शिवाजीस प्रश्न पुसे आपल्या राजकारणाचा ।
सिंहगडावरी अम्मल अझुनी यवनांचा ।
गड किल्ल्याचा हा तात, घेऊनी हातात,
पुणें प्रांतात, खुशाल तुम्ही नाचा ॥
केला विचार शिवाजीनें मातुश्रीच्या वचनाचा ।
आणविला मित्र जिवलग सखा प्राणांचा ।
तानाजी मालुसरे ...
पुढे वाचा. : नरवीर मालुसरे, सिंहगडावर छापा (पोवाडा) - शाहीर रामचंद्र शंकर दळवी