कवीने खरे आहे व मान्यही आहे. नुकताच माझा दृष्टीकोन माझ्या एका आवडत्या व ज्येष्ठबदलवला. 'कवितेच्या क्षेत्रात कुणाचेही मत अंतिम असू शकत नाही'. हे मत मला मान्यही आहे व यापुढे मी ते पाळणारही आहे.


'आणि उरतो फक्त आरसा
दृष्टिकोनाचा'

हे मान्य आहे.

'कविता असावी अमृत-मंथन
ज्याचे त्याने करण्याचे
इथे स्थान नसे आउटसोर्सिंगला
नवनीत गाईडकडे
जे पाजेल उत्तर परीक्षार्थींना बोळ्याने
अभ्यासक्रमानुसार'

वा वा! सुंदर पमा व पटलीही. याच पानावर एक आउटसोर्सिंग केलेली कविता आहे बर का? :-)))

'कविता असावी प्रश्नमंजूषा
जिला सापडू नये उत्तर ’कोहम्‌’चे कधीच
अन्यथा संपेल प्रवास तिचा तिथेच
आणि कवी काढत बसतील झेरॉक्स
पूर्वसुरींचे, पूर्वाश्रमीचे...' -

हे मात्र पटले नाही. कवितेला उत्तर मिळायल हवे असे वाटले. पण पुन्हा, कुणाचेही मत अंतिम असू शकत नाही.

अभिनंदन!