ओंकारप्रसादांची अनुपस्थिती मलाही खटकली. ओंकारप्रसादांप्रमाणेच गानसरस्वतीशी काही काळ वैर घेतलेला पांढऱ्या केसांचा एक मराठी राजामाणूसही कुठे दिसला नाही. किरकोळ शरीरयष्टीचा एक प्रतिभावान बिहारी कवीही. हातात ऍकॉर्डियन घेतलेला एक स्थूलसर गुणी संगीतकारही. मैफल त्यामुळे अपुरी आहे की काय असे मलाही वाटले.