हाहाहा! मस्तच आहे लेख. वर्तमानपत्राचं वावडं असलेल्या मला (हो अर्थात कधीकधी जाहिरातींसाठी घेते म्हणा विकत! ) हा लेख लोकसत्तात वाचणे शक्यच नव्हते. इथे दिल्याबद्दल धन्यवाद. मस्तच लिहिलंय.

माझ्या अभियांत्रिकीच्या प्रवेशाच्या वेळी असलेल्या ७०:३० ची आठवण झाली. अर्थात त्यावेळी अशी ७०% चर्चासत्रं मोठ्या माणसांबरोबर झडली होती आणि ३०% माझ्या मनातल्या मनात! अर्थात नाही म्हणायला तेव्हाही ९०:१०चे सूत्र होतेच की.. ९०% आम जनतेला आणि १०% मॅनेजमेंट कोटा! हे शेकडेवारीचे प्रमाण अर्थात 'काळजात' (कॉलेजला आम्ही काळीज म्हणतो! ) गेल्यानंतरचे झमेले होते, दहावी-बारावीला नाही. आता लोकसंख्यावाढीमुळे की काय दहावीला शेकडेवारीत आणलंय तर काही दिवसांनी पहिली/बालवाडीलाही असेच काहीसे सुरू झाल्यास नवल नाहीच. मग ९०% मुले घरी शिकतील आणि १०% शाळेत! :-)