मैफिलीतली सर्व पात्रे दिवंगत आहेत, हे उघड आहे.
आण्णा हे सुपरिचित गीतकार-कवी. बुवा हे त्यांचे समकालीन गद्य साहित्यीक. आण्णांबरोबरची त्यांची दोस्ती आणि वादही सुप्रसिद्ध. रामभाऊ आण्णांचे समकालीन संगीतकार ( दुसरे रामभाऊ प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक). साध्या कपड्यातले लहानशा चणीचे गृहस्थ प्रसिद्ध गायक-संगीतकार. आण्णांबरोबरची त्यांची जोडी प्रसिद्ध. (मुंबईचा जावई -आशाबाई वगैरे संदर्भ)
पांढऱ्या मिशा केसांचे संगीतकार - हिंदी चित्रपटातील जेष्ठ नाव (सीनेंमे सुलगते है अरमां) -त्यांनी पहिला ब्रेक दिलेला मखमली आवाजाचा गायक-बंगालीत याने तपनकुमार या नावाने गाणी गायली आहेत. पंजाबी अकडबाज संगीतकार -गुणी पण अयशस्वी असा शिक्का बसलेला -'न तुम बेवफा हो' 'कदर जाने ना' 'बेरहम आसमां'  वगैरे - मैफिलीतला तरुण,  म्हणून अकाली निवर्तलेला .उग्र चेहऱ्याचा माणूस - फटकळ, उद्धट म्हणून बदनाम पण अत्यंत गुणी संगीतकार- मेंडोलीनचा शहनशहा.
चष्मेवाले, पातळ मागे फिरवलेले केस असणारे साध्या बुशशर्ट-पँटमधले गृहस्थ - गेल्या वर्षी निधन पावलेले भय-गूढकथा/ कादंबरी लेखक (समर्थ आणि अप्पा) या पात्रांचे जनक
शेवटच्या प्रसंगातली सगळी पात्रे 'सिंहासन' मधील. दिगू टिपणीस नुकताच त्यांच्यात सामील झालेला.