हे असे कराः

मनोगतावरील शब्दकोड्याचे पान उघडा. शक्यतो कोड्याचा पट आणि सर्व पर्याय दिसतील अशा बेताने पान स्क्रोल करा. आता

कळफलकावरील "प्रिंट स्क्रीन" ही कळ दाबा.

आता मनोगतचे पान मिनिमाईझ करा.

"पेंट" किंवा तत्सम इमेज एडिटिंग ऍप्लिकेशन उघडा. तिथल्या "एडिट" पर्यायामधून "पेऽस्ट" या ऑप्शनने "पेऽस्ट" करा. आता हे सेव्ह करा.  जेपीजी प्रकारात.

आता ह्या इमेजची प्रिंट घ्या.

यातला नको तो भाग कढायचा असेल तर...(म्हणजेच जो भाग हवा आहे तेवढाच घेण्यासाठी)

"पेऽस्ट" केल्यावर..

जो भाग हवा आहे त्याला "सिलेक्ट" टूलने निवडा आणि "कॉपी" ऑप्शनने "कॉपी" करा आणि पेंटच्या दुसऱ्या फाईलमध्ये "पेऽस्ट" करा आणि सेव्ह करून त्याची प्रिंट घ्या.

                                                                 .................कृष्णकुमार द. जोशी