प्रथम ही गोष्ट स्पष्ट करतो की मीही एक वरिष्ठ नागरिक असून वयाची साठी केंव्हाच पार केलेली आहे. माझ्या परिचितांमधे 55 वर्षे वयाच्या एक महिला आहेत. त्यांचेही परिस्थिती आपल्या सासूबाईंसारखीच आहे असे वाटते. त्यांचेही पती असेच अकस्मात वारले. या नंतर या बाईंना एकटे रहावयाचे म्हणजे मनस्वी भीती वाटते. हे उदाहरण देण्याचे कारण म्हणजे आपल्या सासुबाईंचे वय हा त्यांच्या प्रॉब्लेममधे महत्वाचा घटक आहे असे मला तरी वाटत नाही. अशा लोकांना एकटे रहाण्याचेच अतिशय भय वाटते.

याला माझ्या मते एकच उपाय आहे तो म्हणजे आपल्या सासुबाईंनी स्वत:च्या आवडीचे छंद किंवा इतर ऍक्टिव्हिटी यात स्वत:ला इतके गुंतवून घेणे की विचार करण्यास सुद्धा वेळ होणार नाही. त्यांना जरा सुद्धा रिकामपण राहणार नाही याचे तुम्ही आणि तुमचे पती यांनी जर काळजी घेतलीत तर त्यांची समस्या दूर व्हावी.