इथे वापरली जाणारी थेट लीप्यंतराची पद्धत उच्चाराधारित आहे. मराठी उच्चाराप्रमाणे आपण जे इंग्रजी स्पेलिंग करू, जवळ जवळ तीच अक्षरे देवनागरी उमटवण्यसाठी वापरावी लागतात. क्वचितच काही विशेष अक्षरे आणि जोडाक्षरे ह्यांसाठी काही विशेष करावे लागते. थोड्या फार सरावाने हे सर्व अंगवळणी पडते.

उच्चाराधारित असल्याने ही पद्धत अंतःसूचक आहे असे आम्हास वाटते. मायक्रोसॉफ्ट, वेब दुनिया, वराह, अक्षरमाला, सायबरशॉपी इत्यादी अनेक मोठ्यामोठ्या कंपन्यांनी त्यांच्या अश्या सुविधांमध्ये उच्चाराधारित पद्धत निवडायचा एकेक पर्याय ठेवलेला आहे, (अशी आमची अटकळ आहे) तो ह्यासाठीच.

समजा तुम्हाला तुमची ही सुविधा अधिक सोपी आणि सोयीस्कर वाटत असेल तर, ती (किंवा वरीलपैकी इतर कुठलीही) वापरूनही येथे देवनागरी मजकूर भरता येईल. हे करताना युनिकोड मजकुर उमटण्यासाठी त्या त्या सुविधेत काय काय करावे लागते हे त्या त्या कंपनीकडून कळेल. फक्त अशी सुविधा वापरताना, इथले लीप्यंतर बंद केलेत की झाले. कंट्रोल-टी दाबून लिखाणाची पद्धत रोमन केलीत की इथले लीप्यंतर बंद होईल आणि तुमच्या त्या सुविधेच्या नियंत्रणाप्रमाणे देवनागरी युनिकोड मजकूर उमटत जाईल.

इथली थेट लीप्यंतराची सुविधा वापरण्यासाठी वेगळे काहीही करावे लागत नाही. ऑफिसात, घरी (आपल्या किंवा मित्राच्या), सायबर कॅफे, सार्वजनिक वाचनालय अश्या कुठून ही जिथे जिथे इंटरनेट आहे तिथे, आय् ई ६ वापरून इथे देवनागरी युनिकोड मजकूर भरता येतो.

तुमच्या त्या सुविधेतही हे करता येत असेल, त्यासाठी त्या कंपनीशी संपर्क साधा.