अत्यंत सुंदर गझल. सगळेच शेर आवडले. पुन्हा पुन्हा वाचली.
या ओळी तर मनात घर करून गेल्या-
"ही एकाकी हवा म्हणाली गुदमरणाऱया गर्दीला...
'भकास व्हावे खेड्यांनी अन बकाल व्हावे शहरांनी!"
"आल्यासरशी निघून जावे आठवणींच्या प्रहरांनी!"
"डोळ्यांनी तर डोळ्यांनी अन अधरांनी तर अधरांनी!!"
"उगाच सांगू नये माहिती मलाच माझी इतरांनी!"
"दोन प्रवासी निघून गेले दोन दिशांना कायमचे..."
"क्षणभर का होईना, व्हावी धूळ सुगंधी अन हिरवी..."
"माजघराची माजघरातच दुःखे व्याली अन मेली...
हिशेब नाही किती पोरके अश्रू पुसले पदरांनी!"