खूप बरं झालं काका तुम्ही उत्तर दिलंत. मी तर हेही समजावलं की ज्यांना मुली असतात ते का य करतात? कुणी बरोबर असणं शक्य नसतच ना त्यांना कधीच. कितीही समानता म्हटली तरी अजूनही मुलींकडे रहणाऱ्या आई वडिलांची संख्या कमीच आहे की. ह्या सगळ्यावर उपाय काय असू शकतो? अहो रिकामपण दूर करणेच फार कठीण आहे. त्यांना कसलीच आवड नाहीये. वाचन, शिवणकाम, भरतकाम, गाणं हे सगळं प्रयत्न करून पाहिलं. त्या फारश्या शिकल्या नाहीत नाहीतर माझी आई अपंगांच्या शाळेत शिकवते वेळ घालवायला म्हणून. त्यांना तेही नाही जमत. पण सगळ्यांनाच असं होतं हे समजल्यावर मला जरा वरं वाटलं की हे त्यांना एकट्यांनाच होत नाहीये.