अभिजितराव, माझेही अगदी असेच अनुभव आहेत. अगदी बालक मंदिरापासून महाविद्यालय व वसतिगृहांपर्यंत जो ऋणानुबंध जुळला आहे, त्याची तुलना कशाशीही करता येत नाही. अन यापैकी एखादी वास्तू पाडून नवी बांधली जाणार असेल तर फार हळहळ वाटते.

नेमका त्यावेळी कॅमेरा तेवढा जवळ नसायचा. म्हणून आजकाल डिजीटल कॅमेरा नेहमी जवळ असतो माझ्याही.

या सर्व मधुर स्मृतींना उजाळा मिळवून दिल्याबद्दल आपले मनापासून आभार.