"तुझा पहिला थेंब अलगद झेलतो चेहर्यावर,
तुझ्यात मिसळून जातो त्याच्या आसवांचा सागर.
एक गगनभेदी गर्जना, एक ठोकलेली आरोळी,
त्याचा अव्यक्त हुंदक्यातुन, त्याच्या हुंकारतुन देते तुला सलामी.
त्यानं वाकुन मुठीत घेतली त्याची माय, माती,
कपाळास लावली पाहून तुझ्याकडे एकवार आभाळी,
जणू ती सौभाग्य त्याचं अन तू ललाटरेषा." ... व्वा, लिहित राहावे- शुभेच्छा !