@मेघना : माझी आजी कोकणातली होती व तिच्या तोंडी कायम 'डेखे' हाच शब्द मी लहानपणापासून ऐकत आले आहे. काही भाज्यांच्या देठांना 'डिखळे'ही म्हणतात. असे शब्द वापरले की नकळत आपल्या आधीच्या पिढीतील लोकांची आठवण मनाला स्पर्शून जाते!

@भानस : लिंबाचा रस वापरून कशी चव लागते ते मला सप्रयोग करून सांगा! माझ्या मते वांग्याचे काप तळल्यावर वरून लिंबाचा रस पिळण्यास हरकत नसावी, पण मूळ पाककृतीत आमचूर पावडर आहे.

@आजानुकर्ण : तुम्ही आता ह्या पावसाळी हवेत घोसाळ्यांच्या भज्यांची उगीच खमंग आठवण करून दिलीत! (आता खायला लागतील! ) वांग्याचे इतर पद्धतींचे काप कदाचित घोसाळ्यांच्या भजीप्रमाणे लागत असतील, पण असे बेसनातील कोरड्या मसाल्याचे काप वेगळेच, छान लागतात.