श्रावणीताई
तुमच्या प्रतिसादातच खरी समस्या काय आहे हे सूचित होते आहे. तुम्ही म्हणता तुमच्या सासुबाईंना कसलीच आवड नाही. हीच त्यांची मूळ समस्या आहे. पण असे खूप लोक असतात एवढाच दिलासा मी तुम्हाला देऊ शकतो.
आता या समस्येवर उपाय काय हा प्रश्न राहतोच? त्याच्यासाठी तुम्ही दोघांनी त्यांच्याशी चर्चा करून प्रथम त्यांना अमेरिकेत राहणे जास्त पसंत आहे की भारतात हे ठरवा. भारतात राहणे जास्त सुखकारक असेल असे मी माझ्या अनुभवाने सांगू शकतो. भारतात नॉन रेसिडे न्ट इंडियन पेरेंटस असोसिएशन म्हणून एक संस्था आहे. त्यांना संपर्क करा. ते अशा एकट्या राहणाऱ्या मंडळींना चांगली मदत करतात.
आता उर्वरित आयुष्या आपलयाला एकट्यालाच काढायचे आहे हे लक्षात घेऊन दिनक्रम कसा आखायचा हे त्यांना ठरवायला सांगा. सकाळी ८ ते संध्याकाळी ८ पर्यंत सतत काहीतरी आक्टिव्हिटी आपल्याला करायचीच आहे हे लक्षात घेऊन हा दिनक्रम त्यांना आखायला सांगा. व त्याप्रमाणे वागणे सुरू होउद्या. हळूहळू मरणाची भीती कमी होईल आणि आयुष्यात परत रस वाटू लागेल.