नेमका संदर्भ आठवत नाही, पण पूर्वी सकाळच्या एका अंकात श्री. मुकुंदराव किर्लोस्करांचा " लोक आत्महत्या का करतात" अशा शीर्षकाचा एक लेख वाचला होता. त्याचे कात्रण माझ्याकडे अजूनही (गावाकडे घरी) आहे. त्या लेखात त्यांनी मेंदूतील एका विशिष्ट मूलद्रव्याचे प्रमाण कमी असणारे लोक (यांत मुले, शेतकरी वगैरे सर्वच आले) आत्महत्या करीत असताना आढळून आल्याचा उल्लेख केला होता. अर्थात या संदर्भात आणखी माहिती कोणाकडे असेल तर अधिक उपयुक्त होईल.