असे खूप जण आहेत हे ऐकून खूप दिलासा मिळाला. नॉन रेसिडेंट पेरेंटस असोसिएशन शोधून आजच काय काय मदत मिळू शकेल ते शोधते. ते सध्या बँग्लोर मध्ये दिसतायत. तसंच काहीतरी मुंबईत असेल तर शोधते. खूप मदत केलीत काका. खूप खूप धन्यवाद. आता मी कुठल्या नवीन नवीन गोष्टी करता येतील ते शोधतेच आहे. परवा सोसायटीमधल्या एका मुलीला इमेल केला होता ती म्हणाली नवीन भजन , भिशी असं सुरू होणार आहे. त्यात त्यांना वेळ घालवता येईल. तुम्ही दिल्याप्रमाणे अजून एक्टीविटीज शोधेन नक्की.