स्मृति येथे हे वाचायला मिळाले:
पानसरे बाई! गरवारे शाळेत आम्हाला इयत्ता ८ वी ला शिकवायला होत्या. मध्यम बांधा, वर्ण सावळा, स्मित हास्य, लांबसडक केसाचा एक शेपटा घालायच्या. वर्गावर आल्या आणि जर का नवीन धडा शिकवायचा असेल तर तो खणखणीत व स्पष्ट उच्चारांसह वाचायच्या. नंतर लगेच त्या धड्याखालच्या प्रश्नोत्तरांना सुरवात. प्रश्न वाचणार व आम्हाला उत्तर शोधायला सांगणार. ज्यांना उत्तर येत असे त्या त्या मुले/मुली सांगत असत. जर उत्तरे चुकली तर सांगायच्या की याचे उत्तर तुम्हाला अमुक अमुक पॅरामध्ये सापडेल. नंतर स्वतः त्या प्रश्नाचे उत्तर सांगणार. अशा प्रकारे सर्व प्रश्न उत्तरे तोंडी सोववून ...