आपल्या या लेखामुळे मला अनेक नवीन गोष्टी समजल्या. पहिल्यांदा त्याबद्दल आपले मनापासून आभार!

काही शंकाः

१. इतर ग्रह, जेथे सध्या प्राणवायू नाही, तेथे याच प्रक्रियेने पुढे आपल्यासारखी सृष्टी होऊ शकते का?
२. इतर ग्रह, जेथे सध्या प्राणवायू नाही, तेथे उपलब्ध असलेल्या , म्हणजे हायड्रोजन सारख्या वायूंवर जगणारे काही जीवाणू असतील का?
 

एक सर्वात महत्त्वाची शंकाः

आपण लिहिले आहेत की मानवी फुफ्फुसे २१% प्राणवायूसाठी सुयोग्य आहेत. मी असेही मत वाचले आहे की मानवाचे दात व आतडी मांसाहारासाठी योग्य नाहीत. त्याच पद्धतीने, मानवी इंद्रिये, जसे, दृष्टी, घ्राणेंद्रिय, कर्णेंद्रिय ही सर्व काही विशिष्ट जाणीवा जाणण्यापुरतीच आहेत का? म्हणजे, अशा काही गोष्टी, जिवाणू, एखादी सृष्टी याच ठिकाणी आत्ताच अस्तित्वात असेल का की जी आपल्याला आपल्यावर असलेल्या मर्यादांमुळे जाणवत नाही. असे काही रंग असतील का की जे मानवाला अद्यापत ज्ञात नाहीत? असे जिवाणू असलेच तर त्यांना 'मानव इथे आहे' याचे ज्ञान होण्याइतपत ते प्रगत असू शकतील का? हे विचारण्याचे कारण असे की आपल्या लेखानुसार प्राणवायू अस्तित्वात आल्यापासून मानव आहे तर प्राणवायू नव्हताच तेव्हाही हिरवे जिवाणू होते व त्यांचे सध्याचे सगळ्यात जवळचे नातलग समुद्रात आहेत. मग ते ज्ञानाने आपल्यापेक्षा प्रगत असू शकतीलही असे वाटले.

मला असे वाटत आहे की अशी एखादी सृष्टी, जी आपल्याला जाणवू शकत नाही, ती अस्तित्वात आहे हे म्हणायला जर वाव असेल, तर भूत ही संकल्पना बऱ्यापैकी स्पष्ट व्हावी.

म्हणजे, मानव ज्याला भूत समजतो ( समजतोच असे नाही, हल्ली तर तसे काही उरलेलेही ऐकिवात नाही ) तो प्रकार एखादी प्रगत किंवा आपल्याला अनाकलनीय सृष्टी असू शकेल का? त्याच नियमाने, देव, दानव या संकल्पना अतर्क्य वाटणे कदाचित बंद होऊ शकेल.