सन्जोप राव,
आपला प्रश्न नक्की कोणाला उद्देशून आहे ते कळाले नाही पण माझ्याबाजूने सांगायचे झाले तर माझ्या मनात प्रस्तावना, साहित्य, पूर्वतयारी, कृती, छायाचित्र, सूचना आणि उपयोग अशा धाटणीत आईच्या विणकामातल्या एखाद्या कलाकृतीबद्दलची माहिती देण्याचे होते. हे ना अनुभवाच्या प्रकारात मोडेल ना लेखाच्या, म्हणून प्रतिसादात असे लेखन करण्यासाठी तसा प्रकार आवाहनात लिहिलेला नसल्याचे नमूद केले. अर्थात लेखक/वाचकवर्ग पाहूनच प्रकारांबद्दल निश्चिती होत असावी, त्यामुळे अशा प्रकाराला असा वर्ग मिळणार नाही अशीही अटकळ असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आवाहन लेखक/कवींना आहे, इतर क्षेत्रातील मराठीत व्यक्त होऊ शकणाऱ्या/इच्छिणाऱ्या कलाकारांना नाही, ही पश्चातबुद्धी आत्ताच झाली मला पण ते असो.
दिवाळीमनोगतने 'अंकसमितीस योग्य वाटल्यास अनुभव/सजावट प्रकारात लेखनानुरूप वर्गवारी करण्याचे पाहू' अशा अर्थाचा व्यनि पाठवला आहे. प्रयत्न नक्कीच करणार मग जे काय व्हायचे ते होऊ दे. :-)