भय हे स्वभविक आहे आणि ते जोपर्यंत आपण स्वतःला शरीर समजतो तो पर्यंत राहणारच. जेंव्हा आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत हा व्यक्तिचा अनुभव होतो तेंव्हाच ते संपते. हे भय अनेक प्रकारे व्यक्त होतेः दुसऱ्यावर अवलंबून असण्याचे भय, अपंगत्वाचे भय, एकटेपणाचे भय, दुसऱ्याच्या मृत्युमुळे वाटलेले स्वतःच्या मृत्युचे भय, सामाजिक अवहेलनेचे भय, मृत्यू कश्याप्रकारे येईल याचे भय, असे भयाचे अनेक प्रकार आहेत. माणूस स्वतःला कश्यात तरी गुंतवून ह्या भया पासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो पण ते संपत नाही म्हणून तर ग्रेस एका कवितेत म्हणतो : 'भय इथले संपत नाही'. जेवढे मन प्रगल्भ तितके भय अधिक.
पण मृत्युचे भयच अमृताचा शोध घेण्याची आस निर्माण करते आणि हीच अध्यात्माची माणसाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे.
तुम्हाला खरोखर काही उपाय करायचा असेल तर असे मन इकडे तिकडे गुंतवण्याचे प्रयोग करू नका त्यातून निव्वळ वेळ जातो आणि भय परत परत भयभित करत राहते. ही तुम्हाला मिळालेली संधी समजा. आपण मरत नाही हे तुम्ही जाणून घ्या आणि मग इतराना ते समजावून द्या. माझ्या लेखमालेचा तुम्हाला उपयोग होतो का ते बघा.
संजय