लहान असताना घरचे सारखे सांगायचे, रोजचा पेपर वाचा. मला तो पेपर वाचण्यात बिलकुल स्वारस्य नसायचे. पण थोडा मोठा झाल्यावर स्वतःहून आवड निर्माण झाली आणि मराठी, इंग्लिश दोन्ही पेपर वाचू लागलो. सांगण्याचा मुद्दा हा की मुलांच्या कानीकपळी ओरडून वाचण्याची आवड निर्माण होत असेल असे वाटत नाही.

पण अत्र्यांच्ये शब्द वाचता वाचता कधी खसखस पिकवतात हे वाचणाऱ्याला सुद्धा कळत नाही. - मला स्वतःला अत्र्यांचे विनोद ऐकून फारसं हसू येत नाही, कारण, माझ्यामते, अत्र्यांचे विनोद हे प्रासंगिक असायचे. आणि तो प्रसंग अनुभवायला आपण तेव्हा नसल्याने नंतर त्यावर किती हसू येणार? (मात्र, अत्र्यांच्या नावावर खपवले जाणारे विनोद मात्र आवडतात.)

दुसरी गोष्ट, वाचण्याचा उद्देश हा जर माहिती मिळवणे हा असेल, तर वाचनापेक्षा टि. व्ही. अधिक चांगला. द्रुक्श्राव्य माध्यमातून माहिती अधिक लवकर आणि जास्त परिणाम कारक मिळेल हा साधा तर्क.