श्री. संजय क्षीरसागर,
आपले विचार खरे तर स्तुत्य आहेत. 'माणसाने स्वतःला शरीर समजू नये' हे खरे तर चांगले तत्त्वज्ञान आहे.
मात्रः
एक मोठी अडचण आहे. एखाद्या माणसाला जर 'आपण मरणार' अशी भीती वाटत असेल तर अचानक त्याला हे तत्त्वज्ञान अंगिकारायला लावणे अशक्य आहे. 'लावणे' मध्ये 'अंगिकारायला लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यानेही' ते मुळात 'अंगिकारले असणे' आवश्यक आहे हे समजून आपण चर्चा प्रस्ताव मांडणाऱ्यालाही ते अंगिकारायला सांगू पाहत आहात.
हा उपाय पटत नाही.
फाशीचे कैदी
अतिदक्षता विभागातील रुग्ण
वयोमानानुसार हालचाल थंडावलेले वृद्ध
दहशतवादी हल्ल्यासाठी तयार केले जाणारे आन्मघातकी लोक
या सर्वांनाच आपल्या या तत्त्वज्ञानाचा फायदा फार प्रचंड होईल. पण ते तत्त्वज्ञान जर औषधासारखे पिता येत असते तर संत महात्मे जन्माला कशाला आले असते?
सगळे जण इतके विरक्त, भौतिकतेच्या पलीकडील विचार करणारे, आयुष्य निरर्थक आहे असे समजणारे नसतात.
त्यामुळे, आपला उपाय व्यवहार्य नाही असे वाटते. आपली लेखमाला निश्चीतच स्तुत्य आहे व तसे मी त्यावरील प्रतिसादात म्हंटलेलेही आहे.
पण एकदम एखाद्या मनो / इतर रुग्णाला ती लेखमाला बाणता येईल असे वाटत नाही.
(विषयांतर वाटलेला भाग वगळला. : प्रशासक)