आपण जे काही करतो ते खरं तर स्वतःसाठीच करतो हा अस्तित्व एक आहे याचा खरा अर्थ आहे. म्हणजे एखादा देशासाठी बलिदान करतो तेंव्हा ते त्याला वाटले म्हणून त्याने केलेले असते, देश दुय्यम असतो (कारण मुळात देश ही कल्पना आहे). जेंव्हा तुम्ही मार्ग शोधता आहात याचा अर्थच असा की कुणामुळे का होईना तुम्हाला त्रास आहे. आपण प्रश्नांची गल्लत करतो. मला माहिती आहे की आपण मरत नाही म्हणून मी तुम्हाला सांगीतले, जर तुम्हाला हे कळले तर तुम्ही दुसऱ्याला सांगू शकाल. आता तुम्हालाच अवघड वाटते तर तुम्ही दुसऱ्याला कसे सांगणार? 

बरं भयभीत माणूस मन तरी कश्यात रमवणार? कारण रमवायला ते जागेवर हवे.  तुम्ही कल्पना करा तुम्ही भयभीत आहात,  आता तुम्ही काय पुलं वाचणार आणि कसले आत्मवृत्त वाचणार? तुम्हाला बाकीचे उपाय योग्य वाटत असतील तर करून पहा. पण सगळे आपण स्वतःसाठी करतो आहोत हे लक्ष्यात असू द्या म्हणजे तुम्हाला पुढेमागे मी काय म्हणतो ते कळेल.

संजय