प्रोत्सहनाबद्दल आभार मंडळी. भूषण यांच्या प्रश्नांची उत्तरे टप्प्याटप्प्याने देते.
१. इतर ग्रह, जेथे सध्या प्राणवायू नाही, तेथे याच प्रक्रियेने पुढे आपल्यासारखी सृष्टी होऊ शकते का?
एका वाक्यात उत्तर म्हणजे हो, शक्य आहे. पण केवळ प्राणवायू नसणे हे आपल्यासारखी जीवसृष्टी तयार होण्यासाठी पुरेसे नाही. त्यासाठी इतर वातावरण आणि मुख्य म्हणजे पाणी आवश्यक आहे. आपल्या जीवसृष्टीला जलाधारित (वॉटरबेस्ड) जीवसृष्टी म्हटले जाते. शिवाय सगळे असून, हवे तसे तापमान, प्रकाश या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत.
२. इतर ग्रह, जेथे सध्या प्राणवायू नाही, तेथे उपलब्ध असलेल्या, म्हणजे हायड्रोजन सारख्या वायूंवर जगणारे काही जीवाणू असतील का?
जीवाणूची कशी व्याख्या केली आहे त्यावर अवलंबून आहे. जीव, जे स्वतःच्या प्रती तयार करू शकतात असे म्हणायचे असेल तर हायड्रोजनवर जगणारे किंवा कसे, पण पाण्याहून वेगळ्या माध्यमात बनलेले, किंवा वेगळ्या तापमानांना सरावलेले, असे वेगवेगळ्या प्रकारचे जीव असणे शक्य आहे. शक्यता छोट्या, पण आहेत. (आपल्या जीवसृष्टीसारखी एखादी असण्याची शक्यताही खूप छोटी आहे, पण आपण आहोत! )