काळाचे संदर्भ बदलले पुन्हा नव्याने
आणि काहींना अवघडले पुन्हा नव्याने
खोटे नाही! मी घुटमळलो जरा जुन्याशी
आशेचे काही क्षण दिसले पुन्हा नव्याने
अर्थाने जो दार किलकिले स्वतःच केले
शब्दांचेही भान हरपले पुन्हा नव्याने
प्रेमाने हा खेळ निवडला जुनापुराणा
कोणाचे काळीज निवडले पुन्हा नव्याने? ... व्वा, आणखी येऊद्यात- शुभेच्छा !