हे माझे पुस्तक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रकाशित होत आहे. त्यात मी 'रामदेवबाबा' यांचे नामकरण 'कामदेवबाबा' असे करून त्यांची 'करणजीतसिहांशी' सभागृहात भेट ( डान्स बार संघटनेचे अध्यक्ष ) यावर लेख लिहून टीका केली आहे. मला बालाजी तांबे यांच्यावर मनापासून लिहायचे होते. आपण लिहिलेत हे पाहून फार बरे वाटले. मला ते पुस्तक आपल्याला पाठवायचे आहे. कमिन्सपुढच्या 'वडेवाले' पाशी पहिल्या आठवड्यात भेटाल काय?
हे तांबे मध्ये सकाळमध्ये लेखमाला लिहीत होते. निरिक्षणांती असे जाणवले की त्यांनी 'हे खाऊ नका' या सदरात जे पदार्थ एकेका लेखात लिहिले होते त्यांची जर यादी केली तर माणसाला उपाशी मरायची वेळ येईल. स्वतः मात्र टुणटुणीत! कसला बोडक्याचा आयुर्वेदिक आहार!
वाग बेदरकार मित्रा वाग बेदरकार मित्रा....
हे एकच तत्त्व! एक जन्म, तोही कधी संपणार हे माहीत नाही, कायदे तरी किती पाळायचे? तेही खाण्या'पिण्या'चे?
ह्यॅ...
(काही भाग वगळला. : प्रशासक)