Abstract India येथे हे वाचायला मिळाले:
आजकाल सगळीकडे प्लॅस्टिक हा शब्द ऐकू यऊ लागला आहे. सुमारे दीडशे वर्षापूर्वी माणसाने ‘प्लॅस्टिक’ या अधातूची निर्मिती केली व शंभर वर्षापूर्वी प्लॅस्टिकने माणसाच्या जीवनात प्रवेश केला. आपल्या घरात नजर टाकली तर स्वयंपाकघरापासून दिवाणखान्यापर्यंत सगळीकडे प्लॅस्टिकच्या वस्तू दिसतील. जणू काही आज प्लॅस्टिक हे आपल्या जीवनाचे अविभाग्य अंग बनले आहे.