आपण सर्वांनी माझा छोटासा लेख वाचला प्रथमतः आपले सर्वांचे आभार. कारण मी कोणी मोठा विचारवंत माणूस आहे, किंवा मी सातत्याने
लिखाण करतो अथवा वाचन करतो असे मुळीच नाही . ह्या विश्वाच्या (ज्ञानी ) पसाऱ्यात नव्हे आपल्या सर्वांच्यात मी अगदी नगण्यच !
मला जे वाटते ते लिहणारा. मला छंद कळता ना व्याकरण. मुळात गद्यातला आणि पद्यातला फरक स्व. बाळ भाटे सरांनी (शिक्षकांनी)
मारून मारून समजवलेला प्राणी मी. मला जे वाटलं ते बोललो , ह्यात विस्तार भयामुळे अनेक मुद्दे दिले नाहित, प्रथमतः त्याबद्दल क्षमस्व!
श्री. मिलिंदजिंच्या मते हे अरुण्यरुदन आहे. मान्य हे अरुण्यरुदन आहे. मला माहीत आहे आपल्या सारखी दोन चार माणसे सोडली तर
कोणी त्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. हि तक्रार मुळीच नाही. पण ह्या चांगल्या किंवा वाईट प्रतिक्रियाच माझ्या सारख्या दगडांना पैलू पाडत
असतात. तेव्हा कौतुकाच्या थापे बरोबर चुकलेल्याचा गुद्दा पण मिळायलाच हवा. कारण गुद्दाच माणूस घडवतो .
आणि हे जे काय लिहिलेला आहे ह्यात माझ्या मुलाचा किंवा माझा उल्लेख हा वानगी दाखल दिलेला आहे, हा प्रश्न माझा एकट्याचाच
नाही हि एका येऊ घातलेल्या पिढिचीता आहे. ह्यात मला कुठेही कोणत्याही माध्यमास उणे पणा देण्याचा माझा हेतू अजिबात नाही. एवढेच
सांगतो की पुस्तक वाचण्यात ज्या काही मजा आहे जी लज्जत आहे, ती सर्वांना चाखता यावी. मी हे हि जाणतो की जबरदस्ती करून हे साध्य होणार नाही . पण आज हा विचार माझ्या एकट्या पुरता न राहता , तो सर्वानं पर्यंत पोहचावा. जर ह्या विचारात तथ्य असेल तर तो विचार
निश्चितच समाजापर्यंत जातोच जातो, हे ठाम मत आहे. ह्यात वाचतील ते वाचतील ह्या विषयी थोडेसे...
आपण नातवाचे उदा. दिले . आपला नातू आपल्याला हे पुस्तक वाचा असे सुचवतो . आत्ता मात्र मी ह्या शब्दाचा वापर करतोय आशा आहे
आपण सुज्ञ क्षमा कराल! आपला नातू हे वाचा असे जे आपणास सुचवतो , निश्चितच मी छातीवर हात ठेवून खात्रीपूर्वक सांगेल की हि किमया तुम्हीच केली असेल नाहीतर......,
असो आपल्या सारखे आजोबा घराघरात होवोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना!
ह्या सगळ्यात ज्या मनोगतने आपल्या सर्वांना हे जे वैचारिकपीठ उपलब्ध करून दिले त्या बद्दल मनोगतचे धन्यवाद!
आजच्या कारगिल विजयदिनिच्या आपणा सर्वांना शुभेच्छाच !
आपले आभार!