काळाचे संदर्भ बदलले पुन्हा नव्याने
आणि काहींना अवघडले पुन्हा नव्याने - आणी? ( आशय अतिशय आवडला. )

खोटे नाही! मी घुटमळलो जरा जुन्याशी - 'खोटे नाही' चा सिग्निफिकन्स समजला नाही.
आशेचे काही क्षण दिसले पुन्हा नव्याने

उंची माझी सोसत नव्हती तशी कुणाला
आभाळाशी हात मिळवले पुन्हा नव्याने - दोन ओळींचा संबंध समजला नाही.

दुःखाच्या तक्क्यावर बसलो उजाडलेला - 'उजाडलेला' चा सिग्निफिकन्स समजला नाही. ( 'मी उजाड होऊन बसलो' असे आहे की 'दिवस उजाडल्याप्रमाणे मी उजाडून बसलो आहे' हे समजले नाही. )
मायेने काळीज उघडले पुन्हा नव्याने - ( दोन ओळींचा संबंध समजला नाही. )

मातीच्या देहात उकिरडे नको फुलाया
मातीच्या गर्भात मिसळले पुन्हा नव्याने - शेरच समजला नाही.

पूर्वेच्या लालीवत दिसला प्रकाश जेव्हा
या रक्ताचे डाग पुसटले पुन्हा नव्याने - सुंदर शेर! अतिशय सुंदर शेर! ( मला समजलेला अर्थ हा की जेव्हा दिवस झाला तेव्हा पुन्हा वेड्या आशा मनात येऊ लागल्या व कालवर झालेल्या मानसिक यातना थोड्या पुसट वाटू लागल्या. )

अर्थाने जो दार किलकिले स्वतःच केले
शब्दांचेही भान हरपले पुन्हा नव्याने - सुंदर शेर!

प्रेमाने हा खेळ निवडला जुनापुराणा
कोणाचे काळीज निवडले पुन्हा नव्याने? - हा शेर अजिबात आवडला नाही.


कृपया, पडलेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण मिळाल्यास आभारी राहीन.