१. कावळा खिडकीत येऊन ओरडला तर पाहुणे येतात.
ह्यावरून पुलंच्या 'पाळीव प्राणी' ह्यातील एक वाक्य आठवले.
"कावळा खिडकीत येऊन बोलला तर पाहुणे येतात असा एक समज आहे. हे जर खरे असतं, तर मुंबईत खोली-दीड खोलीच्या खुराड्यात राहणाऱ्या सगळ्यांनी एव्हाना पिंडाला शिवायला देखिल कावळा जिवंत ठेवला नसता." :-)