मांडे सोडून आपण उल्लेखिलेले पदार्थ आईने आम्हाला अनेकदा हौसेने करून घातले होते. आजही कांही पदार्थ होतातच, पण ती चव नाही. विशेषतः शेंगोळ्या. एक पदार्थ आठवला तो म्हणजे हुलग्याचे माडगे. लसणाच्या स्वादाचे हे हुलग्याचे सूपच म्हणा ना ! असे पदार्थ पचविण्याची क्षमताही जरा कमीच झाली आहे. चकुल्या मात्र पंधरा-एक दिवसातून एकदा खायला मिळतात.