तुमचे आपण मरत नाही हे म्हणणे मला पटले पण ते समजावणे कठीण आहे असे मला वाटते. हे समजावणे स्वभावावर अवलंबून असते. मी कितीही समजावले पण समोरच्याला समजावून घ्यायचे नसेल किंवा त्यांच्या मनात भीती बसलेली असेल तर ती काढणं खूप कठीण आहे असं मला वाटतं आणि यात महत्त्वाचा मुद्दा वयाचा. माझ्या वयाच्या कुणाला मी पुन्हा पुन्हा समजावून प्रयत्न करू शकते पण बऱ्याचश्या म्हाताऱ्या व्यक्तींचं मला माहितेय ते खरं, मी खूप जास्त पावसाळे पाहिलेत हे मत बदलणं खूप कठीण वाटतं.

भयभीत माणसं वय कशी रमवणार हे म्हणणं पटलं पण हे मी माझ्यासाठी करतेय हे नाही पटलं. माझ्याकडून काही मदत होऊ शकणार असेल तर करावी या एकाच हेतूने मी हे करतेय. पुढच्या काही अर्षात भारतात परत जाण्याचा निर्णय सुद्धा घेतलाय मी. फक्त तसं करुनही त्यांना काय फायदा होईल ते मात्र नाही माहीत. ही भीती कशी जाईल कोण जाणे.