छान लेख. औचित्तपूर्ण लेख. लेखा पाठोपाठ रोहिणीची चकोल्याची पाकृ. नागपंचमीला सकाळी दिंड व रात्रीच्या जेवणात चकोल्या/वरणफळ असा कित्येक वर्षांपासूनचा फिक्सड मेन्यु. माझी काकू हुबळीची. ती तिथून येताना हमखास आणायची. खुसखुशीत गोडसर मांडे खासच लागतात. इकडे विदर्भातही माठावर मांडे करतात ते थोडेसे धिरड्या सारखे गिळगिळित असतात. 'कोंड्याचा मांडा करणे' वाकप्रचार आठवला. कोंडाही फेकून देऊ नये तसेच एखादी सुगरण ह्या टाकाऊ कोंड्यापासूनही खूप चविष्ट व पौष्टीक पदार्थ बनवू शकते असा अर्थ असावा.