मतला, आक्रसणे, फसणे, बसणे, ठसठसणे ....सगळी गझल चांगली झाली आहे.  आवडली. मी पुन्हा फसताच सारे लोकही फसले पुन्हा ही ओळ फार फार आवडली. विकतचे दुखणे ठसठसणे ही कल्पनादेखील.

मृदुला ह्यांच्या पहिल्या वाचनातल्या नाहीच ना नियमावली तल्या अनुप्रासामुळे वाचतानाही मजा येते आहे. मावली आणि नियमावली तही मजा आहे. मावली पेक्षा नियमावलीला कागद भावला नसावा. किंवा कागदांना नियमावली भावली नसावी. म्हणून कायद्यांना धाब्यावर बसावेसे वाटायला हवे होते असे वाटून गेले.