आमची आईसुद्धा नेहमी नागपंचमीला दिंड व श्रावण्यातल्या शुक्रवारी सवाष्ण सांगावयाची तेव्हा कडबू किंवा पुरणपोळी करीत असे.

दिव्यांच्या अंवसेला कणकेचे दिवे करीत असे ते आम्ही तुप व गूळ किंवा दुधात गूळ कालवून केलेल्या गुळवणीत कुस्करून खात असू.