तेल, मोहरी, हळद यांची फोडणी करून त्यात तळलेले दाणे व निवडलेल्या साळीच्या लाह्या घालून परतणे, अंदाजाने मीठ व चिमूटभर साखर घालणे. आवडत असल्यास थोडेसे लाल तिखट घालून नीट मिसळणे. साळीच्या लाह्यांचा खमंग चिवडा तयार! डब्यात द्यायला, मधल्या वेळेसाठी, टिकाऊ खमंग पदार्थ!