साळीच्या लाह्या नुसत्या किंवा भाजून त्यांना मिक्सरमधून काढणे. ह्या चुऱ्यात दूध+साखर/गूळ+ केशर/वेलची पूड (पर्यायी) घालून सकाळी नाश्त्यासाठी छान पदार्थ तयार होतो.

ह्या चुऱ्यात ताक/दही, मीठ, चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर घालूनही छान लागते.

वरील दोन्ही पदार्थ आपण राजगिरा, ज्वारी, मक्याच्या लाह्यांचेही बनवू शकतो.

चुऱ्यात गूळ/साखरेचा पाक, तूप घालून, त्यात इतर भाजलेल्या सुक्या मेव्याचे (जसे बदाम, काजू) काप, भाजलेले भरड शेंगदाणे घालून झकास लाडूही करता येतात. किंवा चिक्कीही करू शकतो.

आमच्याकडे आमची थोरली मावशी भाजलेल्या लाह्यांवर मस्तपैकी आमटी घालून द्यायची, वरून कोथिंबीर घालायची. लाह्या फुलून आमटी शोषून घेतात. एकदम टेस्टी! भुरके मारत आमटी पीत पीत ह्या लाह्या खाताना मजा यायची.